सकारात्मक बातमी: मुंबईतला रुग्णवाढीचा दर घसरुन एक टक्क्यावर आला
मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल १ हजार ९६६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवलं. आतापर्यंत १ लाख ८१ हजार ४८५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
काल १ हजार ६२५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत रुग्णांची संख्या २ लाख १७ हजार ९० झाली आहे. काल ४७ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ९ हजार १९९ वर पोहचला आहे. सध्या २३ हजार ९७६ रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत ११ लाख ८९ हजार चाचण्या झाल्या केल्या गेल्या त्यात १८ पूर्णांक १२ शतांश टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत.
