परभणीच्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह अन्य दोघांना लाच घेताना अटक
परभणी: परभणीच्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह अन्य दोघांना साडेचार लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दि. १२ रोजी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर सूर्यवंशी यांच्या घराची अधिकाऱ्यांनी काल रात्री झडती घेतली, त्यावेळी त्यांच्या घरात नऊ लाख ३१ हजार रुपये रोख रक्कम सापडली.
दरम्यान, स्वाती सूर्यवंशी यांच्यासह अन्य दोघांना आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
