जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणी आ. सुरेश धस यांच्यासह ७० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बीड: बीड जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यानं आमदार सुरेश धस यांच्यासह सत्तर जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातल्या एका मंगल कार्यालयात उसतोड मजुरांच्या प्रश्नासंदर्भात आमदार धस यांनी काल मेळावा घेतला होता.
जिल्ह्यात जमावबंदी असतानाही या मेळाव्याला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअतंर्गत गुन्हे दाखल केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
