‘यांच्या’ मृत्यूला जबाबदार कोण? – किरीट सोमैय्या यांचा प्रशासनाला सवाल
मुंबई दि.२२: मुलुंड येथील एका महिला कोविड रुग्णाचा रुग्णालयांनी दाखल न केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या महिलेला त्रास होऊ लागल्यावर तिच्या पतीने आधी मुलुंड पूर्वेतील मिठागर रुग्णालय, सावरकर रुग्णालय व नंतर डॉ. आंबेडकर रुग्णालयात घेऊन गेले. या तीनही रुग्णालयांनी कोविड चाचणीचा रिपोर्ट नसल्याचे कारण देत दाखल करण्यास नकार दिला. अखेर महिलेच्या पतीने रिक्षा सायन रुग्णालयाच्या दिशेने वळवली. सायन रुग्णालयात दाखल केल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
या संदर्भातील माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी ट्विटर च्या माध्यमातून दिली असून सुषमा भेलेकर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी शेवटी केला आहे.
12 तासात ४ हॉस्पिटल चे धक्के नंतर ही एडमिशन नाही
परवा सकाळी सुष्मा ला रिक्षात घेवून पति अनिल, मिठागर हॉस्पीटल, सावरकर हॉस्पिटल, डॉ आंबेडकर हॉस्पिटल ला गेले, परंतु कोविड रिपोर्ट नाही म्हणून एडमिशन नाही. आखीर सायन हॉस्पटलमध्ये मृत्यू
सुष्मा भेलेकर च्या मृत्यूला जबाबदार कोण ? pic.twitter.com/lmxzJGdgrw
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 22, 2020
