डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील ‘राजगृह’ या निवासस्थानावर अज्ञातांकडून हल्ला
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ‘राजगृह’ या निवासस्थानावर आज सायंकाळी दोन अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड करण्यात आली आहे. ‘राजगृह’ चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात अनन्य साधारण महत्व राहिले होते. हे घर त्यांनी पुस्तकांसाठी बांधले होते. डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांचा येथे वावर असे. आज झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी दाखल होत पुढील कारवाईस सुरुवात केली.
या हल्ल्यात घरातील कुंड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून. हल्लेखोरांनी आपली ओळख पटू न देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली. या हल्ल्याचा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी तात्काळ निषेध केला. पहा कोण काय म्हणालं.
दादर येथील 'राजगृह' या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 7, 2020
राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे.
बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते.
आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असुन गृहमंत्र्यांना विनंती
सखोल चौकशी होवुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी @AnilDeshmukhNCP— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 7, 2020
