Mumbai_Suburban_Railway-Web
मेगा ब्लॉक : मध्य, हार्बरवर उद्या ‘ब्लॉक’, पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक
रविवार, २४ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेवर सकाळी ११.२० ते सायंकाळी ३.५० पर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. या वेळेत विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. तसेच माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद लोकल धावणार आहे. सकाळी ११ ते ५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सुटणाऱ्या सर्व लोकल १० मिनिटे उशिराने धावणार आहेेेत. कर्जत-खोपोली दरम्यान दुरुस्तीकामांसाठी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हार्बर लाइनवर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.१० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप मार्गावर मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेल तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वांद्रे/ गोरेगावला जाणाऱ्या लोकलसेवेच्या वेळापत्रकामध्ये बद्दल होणार आहे.
तसेच उद्या पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक नाही. शनिवारी मध्यरात्री वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री ००.३० वाजल्यापासून प. ०४.०० पर्यंत साडेतीन तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या जम्बो ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकलचा खोळंबा होऊ शकतो.
