मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाची संततधार; सखल भागात साचलं पाणी
मुंबई: काही दिवस सुट्टीवर गेलेल्या पावसाने आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसराला आज झोडपून काढले आहे. मुंबईतील सायन, अंधेरी इन्फिनिटी मॉल परिसर, नळ बाजार या परिसरात पाणी साठलेले पाहायला मिळत आहे. ठाण्यातही सखल भागात काही ठिकाणी पाणी जमा झालेले आहे. नवी मुंबई परिसरातही पावसाची संततधार चालू आहे.
सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरात लॉकडाऊन चालू असल्यामुळे आजच्या पावसामुळे नागरिकांची परवड होत नाहीये ही जमेची बाजू. त्यात आणखी एक बाब म्हणजे रेल्वेही सध्या बंद आहे.
