नांदगावकरांच्या तडाख्याने इस्पितळाने बिलाचे ५ लाख केले माफ
मुंबई: कोरोनाच्या संकटात सुद्धा काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूटमार चालूच आहे. अशीच एक तक्रार घेऊन एका तक्रारदाराने शिवसेनेचे अँग्री सुपरमॅन नितीन नांदगावकर यांना फोन केला आणि त्यानंतर या प्रकरणाचा नाट्यमय वळण आले.
या विषयाची पार्श्वभूमी अशी कि मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेल्या बारा दिवसांपासून ऍडमिट राहिलेल्या एका महिला कोविड-१९ रुग्णाचा मृत्यू होतो. या महिलेच्या मुलाच्या हातात नानावटी रुग्णालय प्रशासन सात लाखांच बिल देतं. यातले दोन लाख यापूर्वी या रुग्णाच्या मुलाने भरलेले होते. आता उरलेले पाच लाख रुपये भरल्याशिवाय आम्ही रुग्णाचे पार्थिव नातेवाईकांच्या हवाली करणार नाही असा पवित्रा नानावटी रुग्णालय घेते. यावेळी उर्वरित बिल भरायचे पैसे नसल्यामुळे हवालदिल झालेला मुलाने हा सर्व घटनाक्रम रडत रडत नितीन नांदगावकर यांना सांगतला. त्यानंतर नांदगावकरांनी थेट आपल्या स्टाइलने रुग्णालयात प्रवेश करत रुग्णालय प्रशासनाला फैलावर घेतले. यावेळी त्यांनी अशा प्रकारे त्रस्त झालेल्या सर्व रुग्णांच्या व्यथा या प्रशासनासमोर मांडल्या. यावेळी नांदगावकर फार भडकलेले पाहायला मिळाले. हा सारा रागरंग पाहून अखेर नानावटी रुग्णालय प्रशासनाने या मृत महिलेच्या उपचारांचे बाकी असलेले पाच लाख रुपये तात्काळ माफ करत महिलेचे पार्थिव नातेवाईकांच्या हवाली सुपूर्द केले. यानंतर व्यथित झालेल्या नितीन नांदगावकर यांनी फेसबुक पोस्ट माध्यमातून आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, “मी कधीच श्रेय वादात पडत नाही फक्त गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो …..
हॉस्पिटलमध्ये येणारे बिल ( माफक ) हे प्रत्येकाने भरलेच पाहिजे यात दुमत नाही पण काही खाजगी हॉस्पिटलमध्ये लूटमार चालू असेल तर तेवढं बिल ह्या महामारीत कोणीच भरू शकणार नाही आणि भरू सुद्धा नये .
शेवटी माणुसकी महत्त्वाची पैसा काय कधी पण कमावता येईल ….
बस कोणीही गोरगरीब जनतेला वेठीस धरायचे नाही ……
खाजगी हॉस्पिटल मधला मनमानी कारभार खपून घेतला जाणार नाही !
सर्व डॉक्टरदेवदूतच ….. पण मॅनेजमेंटच्या दबावाला बळी पडतात हे सत्य नाकारून चालणार नाही .
असो महामारी आहे एकमेकांना समजून घ्या .
मॅनेजमेंटने वर्षानुवर्षे लाखो कोटी ह्याच मुंबईतील जनतेकडून कमावले आहेत हे विसरू नका.”
