नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत कोपरखैरणे परिसरात लॉंग मार्च; नमुमपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचाही सहभाग
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बधितांची संख्या कमी करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत असून कोपरखैरणे व तुर्भे विभागातील कोरोना बधितांची मोठी संख्या लक्षात घेता आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत कोपरखैरणे परिसरात लॉंग मार्च काढण्यात आला. यामध्ये कोरोनाशी जिद्दीने लढणाऱ्या पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल उंचावण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ या लॉंग मार्च मध्ये सहभागी झाले होते.
लॉकडाऊन च्या काळात नागरिकांनी घरातच थांबून संसर्गाद्वारे पसरणारी कोरोनाची वाढती साखळी खंडित करावी असे आवाहन लॉंगमार्च मध्ये सहभागी पोलिसांनी केली. या लॉंग मार्च मध्ये परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे व परिमंडळ दोनचे महापालिका उपायुक्त डॉक्टर अमरीश पाटनिगिरे सहभागी झाले होते.
