“माझे पैसे घ्या आणि विषय संपवून टाका” – कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा सरकारी बँकांना प्रस्ताव
लंडन: कर्जबुडवा उद्योगपती मद्यसम्राट विजय माल्ल्या याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेज च स्वागत करणारं एक ट्विट आज सकाळी केलं. या ट्विट मध्ये मल्ल्या म्हणतो की, “कोविड-१९ पॅकेज बद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. त्यांना हव्या तेवढ्या नोटा ते छापू शकतात पण माझ्या सारख छोटं योगदान देऊ इच्छिणारा जो बँकांच सर्व कर्ज फेडू इच्छितो त्याकडे दुर्लक्ष का केलं जातं आहे?” पुढे तो म्हणतो की माझे पैसे घ्या आणि विषय संपवून टाका.”
विजय माल्ल्या याने किंगफिशर एयरलाईन्स च्या कर्जापोटी घेतलेले बँकांचे ९००० कोटी रुपये थकवत थेट लंडन ला पोबारा केला होता. यानंतर बँकांनी त्याची संपत्ती विकत काही पैसे वसूल केले. पण अद्याप मोठा आकडा बाकी आहे. सरकार विजय माल्ल्याचा हा प्रस्ताव स्वीकारते का हे पाहणे लक्षणीय ठरेल.
