कालच्या चुकीबद्दल फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी, नेटकरी म्हणाला “झालेल्या चुकीची माफी मागण्यात लाज कसली?”
काल छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्मरण करणारे एक ट्विट केले होते. या ट्विट मध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला होता. ज्यांनंतर शाहू प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली.
कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस ने यानिमित्त फडणवीसांचा तात्काळ निषेध केला. यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही एक पत्रक काढत देवेंद्र फडणावीसांकडे या चुकीबाबत माफी मागण्याची मागणी गेली. काही तासांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संभाजीराजे यांच्या ट्विटला उत्तर देत याप्रकरणी आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, “छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.”
या ट्विट ला प्रत्युत्तर देताना खासदार संभाजीराजेंनी त्यांचे कान टोचत म्हंटले की, “झालेली चूक मान्य करून, तिच्यात सुधारणा केल्याने कमी पणा होत नसतो.”
फडणवीसांच्या ट्विट वर काही नेटकाऱ्यांनी त्यांना सूनवायला सुरुवात केली. एक नेटकरी म्हणाला की, “माफीनामा द्या दिलगिरी तर दुरुस्तीसाठी रस्ता बंद केलेला कॉन्ट्रॅक्टर पण बोर्ड लावतो..
#माफी_मागा_फडणवीस”
झालेल्या चुकीची माफी मागण्यात लाज कसली? यात आई वडीलांचे संस्कार खूप महत्वाचे असतात.
— Aditya Pawar (@Adityaspeaks007) May 7, 2020
