देशभरात सुमारे ५ लाख ७९ हजार ९५७ कोविड -१९ चाचण्या; एकट्या महाराष्ट्राने केल्या १ लाखांवर चाचण्या
नवी दिल्ली: देशातली विविध राज्य सरकारं आणि खाजगी प्रयोगशाळांनी सुमारे ५ लाख ७९ हजार ९५७ कोविड-१९ आजाराच्या चाचण्या केल्या असल्याची माहिती आय.सी.एम.आर. अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे. एक विशेष बाब म्हणजे एकट्या महाराष्ट्राने आतापर्यंत १ लाख ८ हजारांवर चाचण्या केल्या आहेत.
आय.सी.एम.आर.(ICMR) ने देशातल्या सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळांना कोविड -१९ च्या चाचणी सुविधा द्यायचं काम सुरु ठेवलं असून आतापर्यंत २७२ सरकारी प्रयोगशाळा आणि ८७ खासगी प्रयोगशाळांना कोविड -१९ च्या चाचण्या करायला मान्यता
दिली आहे.
