“..PM Fund मध्ये पैसे जमा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीस कोरोना झाला तर” नेटकऱ्याने चंद्रकांत पाटलांना टाकली गुगली
कोल्हापूर: भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज एक ट्विट करत ‘पीएम केअर’ फंडात पैसे जमा केल्याची माहिती दिली व त्याचवेळी इतरांनाही यात पैसे जमा करण्याबाबत आवाहन केले आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणाले की, “माझा देश हीच माझी ओळख आहे व आज माझ्या देशाला माझी गरज आहे. देशाच्या कोरोना विरूध्द लढतीत, मी माझा खारीचा वाटा समर्पित करीत आहे.आपणही #PMCARE फंडमध्ये आपला खारीचा वाटा समर्पित करून हे चॅलेंज स्विकारावे व आपल्या मित्र मैत्रिणींना नॅामिनेट करावे.”
या ट्विट नंतर नेटकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांना यथेच्छ ट्रोल केले. एका नेटकरी तर थेट म्हणाला की, “अवघा महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल की महाराष्ट्र संकटात असताना महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राला मदत केली नाही…”
अवघा महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल की महाराष्ट्र संकटात असताना महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राला मदत केली नाही…
— Nivas Jadhav – निवास जाधव (@NivasJadhav2829) April 19, 2020
https://twitter.com/kishorp24/status/1251772408282955776?s=19
CM Fund ऐवजी PM Fund मध्ये पैसे जमा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीस कोरोना झाला तर, ते इलाज महाराष्ट्रात करणार की दिल्लीत…?
— Gautam Dhavale (@DhavaleGautam) April 19, 2020
दादा महाराष्ट्राला मदत नाही का ???
— Shital … (@shitalbankar19) April 19, 2020
एकूणच पाहायला गेले तर चंद्रकांत पाटलांनी केलेले आवाहन बहुतांश लोकांना आवडलेले दिसत नाही.
